तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी दत्तात्रय कुंडलिक दाभाडे, तर व्हाईस चेअरमन पदी शुभांगी पांडुरंग दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून एम. ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. तळेगाव दाभाडे विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये झालेल्या निवडीच्या प्रसंगी संचालक बबनराव भेगडे, गुलाब मोरे, शंकर मराठे, अरुण मराठे, प्रवीण मोरे, सचिन दाभाडे, नंदकुमार मोरे, एकनाथ भुजबळ, अशोक शिंदे, मधुमालती मराठे, संतोष भेगडे, किसन लोंढे उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
चेअरमन दत्तात्रय दाभाडे आणि व्हाईस चेअरमन शुभांगी दळवी यांच्या निवडीनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माळवाडी गावचे बजरंग जाधव, गोरख दाभाडे, बबन आल्हाट, अशोक दाभाडे, सुरेश शिंदे, रोहिदास म्हसे, बाळासाहेब दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून कार्यक्षेत्र तळेगाव दाभाडे, वराळे, माळवाडी, नानोली तर्फे चाकण, सोमाटणे, आकुर्डी असे आहे. संस्थेमार्फत पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज दिले जात असून संस्थेची स्वतःची इमारत व गोडाऊन असल्याची माहिती सचिव फाटक यांनी दिली. ( Talegaon Station Societies Election Dattatray Dabhade elected as Chairman )
अधिक वाचा –
– ‘वेळ घ्या, पण आरक्षण द्या’, मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर
– मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात
– पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन