व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वेळ घ्या, पण आरक्षण द्या’, मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाचे प्रमुख आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Maratha-Reservation

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणाचे प्रमुख आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. या निर्णयासह जरांगे यांनी आपले दुसऱ्या टप्प्यातील उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज (दि. 2 नोव्हेंबर) आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तिथे प्रदीर्घ चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जरांगे पाटील यांनी, ‘आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या,’ असे म्हटले. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन देखील जरांगे यांनी मराठा बांधवांना केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेले होते. यावेळी शिष्टमंडळात निवृत्त न्या. मारोती गायकवाड आणि न्या. सुनील शुक्रे, वकील हिमांशू सचदेव तसेच इतर कायदेतज्ञ, मंत्री संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, बच्चू कडू, नारायण कुचे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मराठा आरक्षणा प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचेही आश्वासन दिले. जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर पाटलांनी त्यांचे उपोषण सोडले.

सुरुवातीला जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली होती. परंतू शिष्टमंडळाने वेळ वाढवून मागितली. तेव्हा जरांगे यांनी सरकारला एकही दिवस वाढवून देण्यास विरोध केला. परंतू सरकारच्या शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती केली. जरांगे पाटील मात्र 24 डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. अखेर तारखांबाबत बराच वेळ चर्चा करण्यात आली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे म्हटले. 

तसेच 2 जानेवारीनंतर मुंबईचे नाक बंद करु, असा इशारा त्यांनी बोलताना दिला. सरकारच्या शिष्टमंडळाला मिळालेलं हे मोठं यश म्हणावे लागेल. कारण दिनांक 25 ऑक्टोबरपासून सुरु असलेले जरांगे पाटलांचं उपोषण अखेर त्यांनी सोडवले आहे. ( Maratha Reservation Movement Manoj Jarange Patil called off his fast Breaking News )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचा बोनस भेट
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन गुरुवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, नाहीतर अडकाल…
– वडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण ठाकर । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात

Next Post

धक्कादायक! वडगाव मावळमध्ये एकाच घरातील तीन भावंडे बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

धक्कादायक! वडगाव मावळमध्ये एकाच घरातील तीन भावंडे बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.