व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचा बोनस भेट

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2023
in महाराष्ट्र
Tanaji-Sawant

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये तर 3,664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6,200 रुपयांची घसघशीत मानधन वाढ आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज मुंबई येथे केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक श्री. धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

  • राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना 5000 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज या मानधनात 7000 रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा सेविकांना केंद्र शासन स्तरावरूनही 3000 रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात 3,664 गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आज 6,200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्र शासन स्तरावरूनही 8,775 रुपये मानधन मिळत असून, आता त्यांना 21,175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणा आरोग्य मंत्री प्रा डॉ. सावंत यांनी केली आहे. ( Increase in salary of Asha Sevika also will get Diwali bonus announcement by Minister Tanaji Sawant )

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात, मराठा आरक्षणासाठी करत होते आंदोलन
– ‘आरक्षण आमच्या हक्काचं…’, टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा
– कौतुकास्पद! मावळ कन्येचा ‘झिरो ते हिरो’ पुरस्काराने मुंबईत सन्मान


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन गुरुवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, नाहीतर अडकाल…

Next Post

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MCED

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.