व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन

नव्याने उद्योग- व्यवसाय करु इच्छिणाऱ्या नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
MCED

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्याच्या औद्योगिक क्रांती आणि आर्थिक विकासात पिंपरी- चिंचवडचे मोलाचे स्थान पाहता शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून नवउद्योजकांना उद्योग व्यवसायातील विविध संधी, नोंदण्या, परवाने, शासकीय कर्ज योजना आदींची माहिती केंद्रामार्फत देण्यात येणार आहे. नव्याने उद्योग- व्यवसाय करु इच्छिणाऱ्या नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ही उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून राज्यात उद्योजकतेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा या उद्देश्याने सन 1988 संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात संस्थेला कार्यालय, प्रशिक्षण घेण्याकरिता मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सामान्य नागरिकांना उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळावा, याकरिता संस्थेमार्फत विविध प्रकारचे निशुल्क तसेच सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात.

मागील गेली 35 वर्षांपासून जवळपास 16 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी संस्थेमार्फत लाभ घेतलेला आहे. प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणोत्तर नव्याने उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी एमसीईडी मदतीचा हात देते आणि प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय सुरु होण्याकरिता आवश्यक मार्गदर्शन करते. नवउद्योजकांना शासकीय कर्ज योजना, अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम केंद्रामार्फत राबविण्यात येतो.

अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड भागातील इच्छुक नागरिकांनी गेट क्र. 2, ऑटो- क्लस्टर आवार, सी-181, एच ब्लॉक, चिंचवड येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत करण्यात आले आहे. ( Establishment of Maharashtra Entrepreneurship Development Center in Pimpri Chinchwad city )
अधिक वाचा –
– वडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण ठाकर । Maval News
– मोठी बातमी! मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात, मराठा आरक्षणासाठी करत होते आंदोलन
– ‘आरक्षण आमच्या हक्काचं…’, टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचा बोनस भेट

Next Post

मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.