वडगाव मावळ : संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नारायणराव बाबुराव ठाकर यांची आंदर मावळातील वडेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या चेअरमन पदी तर महादू कान्हू कशाळे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शांताराम लष्करी, मारुती शिंदे, संचालक बबन हेमाडे, राजू खांडभोर, आशा मारुती खांडभोर, कुसूम तुकाराम लष्करी शैलेश हेमाडे, मधूकर तुपके, तानाजी शिंदे, शंकर पांडे, मुकुंद खांडभोर आदी उपस्थित होते. Narayan Thakar as Chairman of Vadeshwar Society Maval News
यावेळी छगन लष्करी, शिवसेना तालुकाप्रमुख राजु खांडभोर, मारुती खांडभोर आदींच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंदार कुलकर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच त्यांना सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव उमेश वाडेकर यांनी कामकाज केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! मावळ कन्येचा ‘झिरो ते हिरो’ पुरस्काराने मुंबईत सन्मान
– मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू
– Breaking! मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे