वडगाव मावळ शहरातील माळीनगर भागात एकाच घरातील तीन लहान भावंडे बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलांचे अपहरण झाले असावे अशी शंका व्यक्त करत मुलांच्या पालकांनी या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दाखल केली. दिनांक 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजेपासून मुले बेपत्ता असून गुरुवार दि. 02 नोव्हेंबर रोजी दुपारी पाऊणेचार वाजता या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादवी क. 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीनगर मधील फिर्यादी यांच्या राहत्या झोपडीसमोरून त्यांची 13 वर्षीय मुलगा आणि 11 वर्षीय व 9 वर्षीय दोन मुली अशी तिनही भावंडे बेपत्ता झाली आहेत. तिनही मुलांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फुस लावुन पळवुन नेले असून त्या अज्ञात व्यक्तीविरूध्द कायदेशीर फिर्याद असल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म.पोसई मोहीते हे करत आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक वडगाव मावळ यांनी दिली. ( three children from same house are missing in Mali Nagar area of Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना; विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन
– मोठी बातमी! राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचा बोनस भेट
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन गुरुवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, नाहीतर अडकाल…