Dainik Maval News : कोणत्या खेळामध्ये अथवा स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला पूर्ण क्षमतेने उतरावे लागते, जर तुम्ही पूर्ण क्षमतेने उतरलात तर यश नक्कीच मिळते. त्यामुळे तुम्ही स्पर्धेत पूर्ण क्षमतेने उतरा असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय कुलदीप प्रधान यांनी केले.
पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. त्याप्रसंगी मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले, नानाभाऊ शेळकंदे, विजय मारणे, मिनीनाथ खुरसूले, निर्मला काळे तसेच सर्व केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व सर्व सहभागी स्पर्धक शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक सक्षम असला पाहिजे, असा विशाल दृष्टिकोन ठेवून पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धांचे आयोजन दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 2024 या दोन दिवसात करण्यात आले.
दोन दिवसात शिक्षकांच्या तब्बल 16 स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 184 स्पर्धक सहभागी झाले होते. सदर उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती सविता पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख मुकुंद तनपुरे यांनी मानले. सदर प्रसंगी आपल्या भाषणात गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबरोबरच शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या ताण-तणावाचे व्यवस्थापन व्हावे असा उदात्त हेतू व्यक्त केला.
तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा अंतर्गत 29 नोव्हेंबर 2024 रोजी पंचायत समिती वडगाव मावळ कार्यालयात वक्तृत्व, निबंध, रांगोळी, गीत गायन, व्हिडिओ निर्मिती, स्वरचित कविता गायन, कथाकथन, चित्रकला या नऊ स्पर्धा घेण्यात आल्या तसेच दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा माळवाडी येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती, कार्यानुभव कागद काम, प्रश्नमंजुषा, 100 मीटर धावणे, फलक लेखन, पोवाडा गायन अशा 6 स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर सर्व स्पर्धांचे निकोप, निपक्षपातीपणे व पारदर्शक मूल्यमापन करण्यासाठी तालुक्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळांचे निपुण शिक्षक तसेच पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान चे सर्व कर्मचारी यांनी पंच म्हणून काम पाहिले. 30 नोव्हेंबर रोजीच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा माळवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke