मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ बुधवारी ( दिनांक 23 नोव्हेंबर) रात्री एका टँकरला आग लागली. मात्र, विविध बचाव यंत्रणांनी वेळीच धाव घेत मदतकार्य केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. ( Tanker Transporting Asphalt Caught Fire On Mumbai Pune Expressway )
डांबर वाहतूक करणाऱ्या टँकरला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अंडा पॉइंट येथे अचानक आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा, खोपोली फायर ब्रिगेडची टीम, आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोहोचले आणि आग अटोक्यात आणण्याचे काम केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक सुधाकर लहाने, बोरघाट पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक महेश चव्हाण यांनी या अपघातात रेस्क्यू दरम्यान मदत केली. टँकरच्या केबिनला आग लागली होती ती वेळीच अटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. आयआरबी यंत्रणेने सदर टँकर क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढला आणि वाहतूक सुरळीत केली.
अधिक वाचा –
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय
– लव्ह मॅरेजनंतरही दुसरीवर जीव जडला, दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीसोबत केले भयानक कृत्य