Dainik Maval News : तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि CNG वर चालणारी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर Tata Punch CNG हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी किमतीत चांगली सेफ्टी देणाऱ्या कारमध्ये आता Tata Punch CNG चे नाव अग्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे या कारला आता ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये Tata Punch CNG ला ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित CNG कारांपैकी एक ठरली आहे.
क्रॅश टेस्टदरम्यान Tata Punch ची टक्कर सामान्य कारशी नाही, तर एका ट्रकसोबत करण्यात आली. जोरदार धडकेनंतर कारच्या फक्त पुढील बोनट भागाला नुकसान झाले, तर बोनटच्या मागील भाग पूर्णपणे सुरक्षित राहिला. टेस्ट दरम्यान गाडीत बसवण्यात आलेले डमी प्रवासी पूर्णपणे सुरक्षित राहिल्याचे दिसून आले, त्यामुळे या कारची सेफ्टी अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट झाले.
इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. रोजच्या वापरासाठी ही कार किफायतशीर मानली जाते, कारण CNG मुळे पेट्रोलच्या तुलनेत इंधन खर्च कमी होतो. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
Tata Punch चे डिझाईन लहान SUV सारखे दिसते. या कारमध्ये उंच ग्राउंड क्लीयरन्स मिळतो, त्यामुळे खराब रस्त्यांवरही गाडी सहज चालवता येते. या कारमधील मुख्य फीचर्समध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि मल्टीपल ड्रायव्हिंग फीचर्स मिळतात. या फीचर्समुळे कमी बजेटमध्ये ही कार अधिक आकर्षक ठरते.
ही कार भारतात किफायतशीर श्रेणीत येते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ५ ते ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि व्हेरियंटनुसार किंमत वाढते. म्हणून कमी बजेटमध्ये सुरक्षित, मजबूत आणि चांगले मायलेज देणारी CNG कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही कार चांगला पर्याय मानली जात आहे.
टाटा कारचे अधिकृत डिलर असलेल्या पंचजन्य ऑटोमोबाईल तळेगाव दाभाडे ( ता. मावळ, जि. पुणे ) येथील मॅनेजर स्नेहल काळे यांनी, टाटाची पंच CNG कार ही ग्रामीण भागातील नागरिकांची पसंतीची कार ठरत असल्याचे सांगितले. कमी किंमत, सीएनजी मुळे चांगले मायलेज आणि भक्कमपणा यामुळे टाटा पंच सीएनजी कारला ग्राहक अधिक पसंती देत आहे, असे स्नेहल काळे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब