मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पवना धरणात बुडून एका शिक्षक पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रेम प्रकाश रोशनलाल भाटिया (वय 62, रा. कुर्ला ईस्ट, मुंबई, सद्या रा. चेंबूर, मुंबई) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ( Teacher Tourist From Mumbai Drowned In Pavana Dam )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार दुधिवरे गावाजवळ पवना डॅमच्या बॅकवॉटर भागात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पर्यटकांपैकी शिक्षक प्रेम प्रकाश भाटिया यांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने डॅममध्ये बुडून मृत्यू झाला. लोणावळा ग्रामीण पोलिस, पोलिस मित्र, शिवदूर्ग टीम, वन्यजीव रक्षक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने सदर शिक्षकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय गाले, पोलीस मित्र मारुती चोरगे, बाळा पांडे यांसह शिवदुर्ग टीम, महेश मसने, राजेंद्र कडु, प्रणय अंबुरे, सागर कुंभार, कपील दळवी, सतिष आहेर, अतुल लाड, सुनिल गायकवाड आणि स्थानिक यावेळी उपस्थित होते. सदर शिक्षकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथे नेण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग । देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
– बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ