लोणावळा शहराजवळील ( Lonavala City ) वलवण ( Valvan ) ब्रीजवर बुधवारी (दिनांक 23 नोव्हेंबर) रोजी सकाळी 7 च्या सुमारास टेम्पोने एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक सिध्दप्पा गुरुपाद कुल्लुर (वय 40 वर्ष) गंभीररित्या जखमी झाला. सदर चालकाला उपचारासाठी सोमाटणे ( Somatane ) येथील पवना हॉस्पिटलला ( Pavana Hospital ) दाखल करण्यात आले, परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हैयलप्पा गुरुपाद करनुर (वय 32 वर्ष, रा. सिंदगी, जि. विजापुर) याने याबाबत लोणावळा शहर पोलिसांत ( Lonavla City Police ) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणी भारतीय दंड संहिता क 304(अ), 279 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Tempo Driver Dies In Accident On Valvan Bridge Near Lonavala )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; 23 नोव्हेंबर रोजी फिर्यादीचा भाऊ सिध्दप्पा गुरुपाद कुल्लुर (वय 40 वर्ष) हा मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना त्याच्या ताब्यात असलेल्या टेम्पो (क्रमांक MH 14 FT 105) याने लोणावळा जवळील वलवण ब्रीजवर एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. यात सिध्दप्पा गुरुपाद कुल्लुर (वय 40 वर्ष) हा गंभीर जखमी झाला. ज्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान फिर्यादीने तक्रारीत सदर अपघातात आपल्या भावाचीच चूक असल्याचे म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संदेश बावकर हे करत आहेत. ( Tempo Driver Dies In Accident On Valvan Bridge Near Lonavala )
अधिक वाचा –
– तुमच्याकडेही भाडेकरू आहेत का? 7 दिवसांत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे माहिती सादर करा, अन्यथा…
– Video : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला आग, वेळीच मदत पोहोचल्याने अनर्थ टळला
– अबब..! मुंबई-बंगळुरु महामार्गावर मागील 6 महिन्यांत तब्बल 40 कोटींचा दंड वसूल