Dainik Maval News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांभोवतीच्या रिंगरोड च्या कामाची सद्यःस्थिती आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामांचा पूर्ण होण्याचा कालावधी यासंदर्भात शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विचारणा केली. तसेच, हे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर सरकारच्या वतीने मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले.
आमदार सुनील शेळके आपल्या प्रश्नात म्हणाले की, “तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया आणि कार्य आदेश काढण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी जाईल. महामार्गाचे काम पूर्ण होण्यास दोन अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अस्तित्वातील रस्त्याच्या ताब्यातील जागेतील बाजूपट्ट्यांसह रस्त्याचे मजबुतीकरण करून तत्काळ प्रश्न मार्गी लावणार आहेत का? खड्डे दुरुस्ती करून छेद रस्त्यांच्या ठिकाणी त्वरित व्यवस्था, उपाययोजना करणार का ?” असे प्रश्न आमदार शेळके यांनी उपस्थित केले.
त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले, “पुणे रिंगरोडच्या पश्चिम विभागातील कामे मे २०२७ पर्यंत आणि पूर्व भागातील कामे २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. त्यावरील सुरळीत वाहतुकीसाठी प्रयत्न चालू आहेत. तात्पुरत्या स्वरुपातील उपयोजनांबाबतची शक्यता तपासून घेतली जाईल,” असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
