मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज (रविवार, 5 फेब्रुवारी) रोजी गहुंजे गावाच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. अतिवेगात असलेली कार ( MH 03 CM 6146 ) अनियंत्रित झाल्याने दुभाजकाला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की दुभाजकाचा पत्रा थेट कारमध्ये घुसला. या भीषण अपघातात चालक गंभीर झाला असून कारमधील अन्य दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता प्रचंड होती तरीही सुदैवाने यात कोणीही दगावले नाही. ( Terrible Car Accident on Mumbai Pune Expressway Near Gahunje Village Three People Injured )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, वृद्ध आई-वडिल यांना घेऊन मुलगा डेन्झिल घोन्सालवीस हा कारचालक मुंबईवरून पुण्याकडे जात होता. तेव्हा अतिवेगाने त्याचे कारवरील नियंत्रण हुकले आणि गहुंजे पुलाखाली कार डिव्हाडरला धडकली. यात डिव्हायडरचा पत्रा कारच्या थेट आरपार घुसला. त्यामुळे चालक तब्बल अर्धातास कारमध्ये अडकून राहिला होता.
सदर अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, आयआरबी कर्मचारी, देवदूत रेस्क्यू टीम आणि शिरगाव परंदवडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शर्थीने कार चालकाला बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध हॉटेलमध्ये न्यूड पार्टी, पोलिसांच्या छाप्यात अश्लील नृत्य करणारे 53 जण ताब्यात
– पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी