Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत रंजक होणार असल्याचे दिसत आहे. आमदार सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देत मावळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उडी मारली आहे. तर त्यांच्या या भुमिकेला पाठींबा देत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पदाचे राजीनामे देत महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. अशात तालुक्यात महाविकासआघाडीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सुनिल शेळके आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या बापूसाहेब भेगडे यांच्या विरोधात अद्याप तरी महाविकासआघाडीने आपला उमेदवार दिलेला नाही. राज्यात महाविकासआघाडीच्या बहुतांष जागा जाहीर झाल्या असून काही मोजक्याच जागांचे चित्र स्पष्ट झालेले नाही, त्यात मावळ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. शेळके आणि भेगडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप तरी त्यांचा उमेदवार दिलेला नाही. परंतु महाविकासआघाडी मावळात अपक्ष उमेदवाराचा पाठींबा देणार असल्याची विश्वसनीय माहिती दैनिक मावळला त्यांच्या विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.
महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात उमेदवार न देता महाविकास आघाडीने बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत महाविकास आघाडी कडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरीही लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत सूचना दिल्या जातील आणि त्यानंतर तालुक्यातील पदाधिकारी याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सूचना देतील किंवा थेट वरीष्ठांपैकीच कुणीतरी सर्वांना याबाबत थेट मार्गदर्शन करेल, अशीही माहिती मिळत आहे. यामुळे अर्थातच मावळची विधानसभा निवडणूक ही पुन्हा भेगडे विरुद्ध शेळके अशीच होइल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
बापूसाहेब भेगडे हे सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यावेळी सर्वपक्षीय नेते त्यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहून पाठिंबा जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी रविवारीच महाविकासआघाडीचा निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि. 24) जेव्हा सुनील शेळके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. त्या गर्दीला टक्कर देणारी गर्दी बापूसाहेब भेगडे यांच्याकडून केली जाणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News
– धक्कादायक ! जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक, पैसे परत न देता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी