Dainik Maval News : टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) – पावसाचे दिवस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने त्याठिकाणी डास उत्पत्ती होऊन साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या टाकवे गावात जनजागृती, कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे.
- सदर मोहिमेनुसार घरोघरी डेंगू, मलेरिया विषयी कंटेनर सर्वेक्षण तसेच आरोग्य कर्मचारी आशा सेविका घरोघरी जावून माहिती पत्रकाच्या माध्यमातून डास अळी सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे आदींविषयी जनजागृती करीत आहे. यासह एक दिवस कोरडा पाळावा असेही आवाहन नागरिकांना केले जात आहे.
नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करून अंगभर कपडे घालावे, दाराला व खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, डास चावणार नाही अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती साधने नष्ट करून एक दिवस कोरडा पाळावा. ताप असल्यास रूग्णालयाशी संपर्क करावा, भंगार साहित्य, कुलर्स, टायर्स, नारळाच्या कवट्या, प्लॅस्टीकची तुटलेली भांडी, गाडगे, मडके सर्व नष्ट करावे या सुचना आरोग्य विभाग मार्फत नागरिकांना करण्यात येत आहेत.
सदर कंटेनर सर्वेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी डॉ नागेश ढवळे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक अमित बागडे, आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर राऊत, आरोग्य सेवक संजय सावत, आशा सेविका वंदना कदम, रूपाली जांभुळकर, हेमा कदम यांनी केले.
ताप, अंगदुखी वाटल्यास घरीच औषध न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या परिसरात होत असलेल्या कंटेनर सर्वेक्षणला प्रतिसाद देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. – डॉ. नागेश ढवळे, वैद्यकीय अधिकारी टाकवे आरोग्य केंद्र
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime