मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. ( Traffic jam on Mumbai Pune Expressway Due To Independence Day Weekend )
खंडाळा बोरघाटात अनेक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. शनिवार, रविवार आणि 15 ऑगस्ट, पतेती अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांनी आपले खाजगी वाहन रस्त्यावर आणले आहे. तयामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी देखील बोरघाट, खंडाळा घाट आणि लोणावळा इथे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
स्वातंत्र्यदिनास पर्यटनाचा ट्रेंड वाढू लागला असून, या दिवशी लोणावळ्यात वर्षाविहारासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होते. वीकेंड आणि स्वातंत्र्यदिनास जोडून आलेल्या सुटीमुळे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. अनेकांनी हॉटेल व रिसॉर्ट आरक्षित केले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे.
पर्यटकांमुळे शनिवारी व रविवारी बोरघाटात द्रुतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू होती. रविवारीही पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे चित्र होते. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत लागल्याचे पहावयास मिळाले. ( Traffic jam on Mumbai Pune Expressway Due To Independence Day Weekend )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पदभार स्विकारताना सरपंचाने घेतली संविधान शपथ! मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना, राज्यात होतेय चर्चा – Video
– दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– पवना शिक्षण संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ जनजागृती रॅली