Dainik Maval News : शनिवार-रविवार वीकेंड आणि वीकेंडला जोडून आलेली रमजान ईदची सुटी यामुळे शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाल्याचे सोमाटणे फाटा येथे रविवारी पाहायला मिळाले.
- रविवारी गुढीपाडवा, सोमवारी रमजान ईद अशा सणांमुळे सलग सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक शुक्रवारी, शनिवारी घराबाहेर पडले. सणानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते, यामुळे शुक्रवारपासूनच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.
जुना पुणे-मुंबई महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने, महामार्गावरील सोमाटणे टोलनाका, सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.
अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
सोमाटणे फाटा येथील सेवा रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत आहे. विक्रेत्यांच्या रस्त्यावरील दुकानांमुळे सेवा रस्त्याने शिरगाव, परंदवडीमार्गे पवन मावळात जाणाऱ्या वाहनचालकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. परिणामी, वाहतूक धिम्या गतीने सुरु राहते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade