मावळ तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील शेतकऱ्यांसाठी गेस्टॅम्प कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेळीपालन या विषयी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. यात वडेश्वर ग्रामपंचायत मधील डोंगरवाडी, सटवाईवाडी आणि शिंदेवाडी तसेच इंगळून ग्रामपंचायत अंतर्गत सुपेवाडी, कुणे याठिकाणच्या शेतकऱ्यांचा समावेश होता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
प्रशिक्षण शिबिराच्या प्रास्ताविकात होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे समुदाय विकास सम्नवयक ऋषीकेश डिंबळे यांनी, ‘या भागामध्ये शेतीपूरक व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना पुढे अनुदान देऊन व्यवसायात मदत केली जाईल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात काम करत आहे. संस्थेच्या संस्थापिका डॉ. केरोलीन या भागाच्या विकासाठी सामाजिक उत्तर दायित्त्व निधी मिळवून या भागाचा विकास करण्यावर भर देत आहेत,’ असे सांगितले. ( training camp on goat rearing for hilly areas farmers in maval taluka )
प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक सतीश राहनेर यांनी शेळी पालन या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मागर्शन केले. प्रशिक्षण सत्रासाठी प्रकल्प प्रमुख डॉ. हेलगा, सीएसआर हेड अंकिता कोठारी, समुदाय विकास व्यवस्थापक शकील शेख, सह व्यवस्थापक परम आंनद, समुदाय समनव्यक ऋषिकेश डिंबळे, सामाजिक कार्यकर्ते लहू मोरमारे, सरपंच छाया हेमाडे, सरपंच सुदाम सुपे, रुपाली सुपे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणासाठी उपस्थित 554 शेतकऱ्यांना यावेळी गेस्टॅम्प कंपनी यांच्या सहकार्याने आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्यामार्फत शेती अवजारे कुदळ, फावडे, हातपंजा, खुरपे, विळा आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या सरपंच महोदय यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर
– भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024
– कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke