शिळींब गावातील आदिवासी कातकरी कुटुंबातील रोहिदास बबन वाघमारे आणि गोपीनाथ तुकाराम पवार यांच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. ही घटना दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली आहे. दोन्ही कुटुंब शिळींब गावच्या डोंगराळ भागात झोपडीत राहत होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
अचानक लागलेल्या आगीवेळी घरामध्ये कोणी नव्हते, सर्व कुटुंब कामानिमित्त गावामध्ये मजुरीसाठी गेले होते. दुपारी लागलेल्या आगीमुळे झोपड्या जळून खाक झाल्या. त्यामध्ये दोन्ही कुटुंबाचे काही हजाराचे नुकसान झाले आहे. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये काही धान्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ( tribal Katkari family hut burnt down at Shilimb Village )
परिसरातील नागरिकांकडून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. आदिवासी कातकरी कुटुंब हाताला मिळेल ते काम कामामधून मिळालेले पैसे यावर त्याचे जीवन. ऐन सणासुदीला झोपडी जळून खाक झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावर घटनेच्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात लावून वाघमारे आणि पवार कुटुंबाला मदत करावी असे आव्हान करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News
– ‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना