भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्यावतीने स्वर्गीय खासदार गिरीष बापट यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि तळेगाव दाभाडे नगरीचे कर्तृत्ववान सुपूत्र स्व. गिरीष बापट यांच्या स्मरणार्थ सर्व पक्षीय श्रध्दांजली कार्यक्रम गुरुवार ( दिनांक 20 एप्रिल 2023) रोजी सायंकाळी ६ वाजता नाना नानी पार्क सभागृह इथे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व विविध संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. ( Tributes to late MP Girish Bapat from all party leaders and office bearers at Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाची सुरुवात स्व. बापट साहेब यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतराव काळोखे गुरुजी आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री बाळा भेगडे, विद्यमान आमदार सुनिल शेळके, गणेश भेगडे, संत तुकाराम सह. साखर कारखाना उपाध्यक्ष बापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, जनसेवा समिती संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, मावळ तालुका भाजप अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, भाजपा तळेगाव शहराध्यक्ष रविंद्र माने, माजी उपनगराध्यक्ष सुशिल सैंदाणे, कलापिनी संस्था विश्वस्त डॉ. अनंतजी परांजपे, डॉ.शाळिग्राम भंडारी, मनसे नेते सचिन भांडवलकर, रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष संदिप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, शिवसेना उबाठा शहर प्रमुख देवा खरटमल, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय मेढी काका, दौलत भेगडे आदींनी स्व. बापट साहेब यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक आणि सरचिटणीस विनायक भेगडे यांनी केले. या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते, पत्रकार बंधू, कार्यकर्ते, विविध संस्था पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सहकार्य भाजपा नेते अशोक काळोखे आणि भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी, मोर्चा – आघाडी पदाधिकारी यांनी केले.
अधिक वाचा –
– तळेगावात पार पडला संतशिरोमणी श्री गोरोबाकाका यांचा 706वा पुण्यतिथी सोहळा
– देव तारी त्याला कोण मारी! खंडाळ्यात ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळलेल्या ओडिशाच्या ‘हरिश्चंद्र’ला रेस्क्यू टीम्सकडून जीवदान