मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी (13 नोव्हेंबर) रोजी रात्री किमी 40.600 येथे ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. तर, तीन जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच हायवेवरून जाणारे प्रवासी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि पोलिसांनी तातडीने मदत, बचावकार्य सुरू केले. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. ( Truck and Bus Accident on Mumbai Pune Expressway Near Khopoli )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण घटनाक्रम ;
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ( ट्रक नं MH-40- BG- 3457 ) ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक थेट डिव्हायडर ओलांडून पलिकडील मुंबई लेनवर गेला. त्यावेळी त्या मार्गाने जाणारी संपूर्ण प्रवाशांनी भरलेली बस ( बस नं KA-41-D-1471 ) या बसवर तो ट्रक आदळला. या भीषण अपघातात बसमधील प्रवासी मोठ्या संख्येने जखमी झाले, ज्यात दोन गंभीर आहेत. तर ट्रक पलटल्याने ट्रकमधील स्क्रॅप रस्त्यावर विखुरले गेले. ट्रक चालक नावेद खान (रा. नागपूरध) आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, अन्य 15 प्रवासी जखमी आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार, 72 तासात 2 गुन्हे दाखल झाल्याने निर्णय, आव्हाडांच्या ट्विटमुळे खळबळ
– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाळा भेगडेंवर मोठी जबाबदारी !