मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) गिरीदुर्ग प्रकारातील किल्ले तुंग (Tung Fort ) हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात असलेला हा किल्ला फक्त पर्यटनच नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या इतिहासात किल्ले तुंगचे स्थान महत्वाचे होते. त्यामुळे वर्षभर या किल्ल्यावर पर्यटकांचे येणे-जाणे सुरुच असते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
परंतू किल्ले तुंग हा सुळक्यासारखा असून टेहळणी गड प्रकारातील असल्याने त्याची चढाई करणे तितकेसे सोपे नाही. तसेच अनेक ठिकाणी किल्ल्याच्या वर जाताना पर्यटकांना मोठा त्रासही सहन कराला लागतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करुन तुंग किल्ल्यावर जाताना आता अवघड ठिकाणी रोप लावण्यासाठी क्लायम्बिंग रोप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या ( sahyadri pratishan ) महत्त्वाच्या दुर्गसंवर्धन मोहिमेत तांत्रिक ज्ञानाने भूमिका बजवणारे, कोणतेही रेसक्यू ऑपरेशन उत्तम रित्या पूर्ण करणारे, उत्कृष्ट गिर्यारोहक, तसेच डेला ऍडवेंनचरचे असिस्टंट जनरल मॅनेजर गणेश गिध यांच्या सहकार्याने हे क्लायम्बिंग रोप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ( Tung Fort Maval Climbing Rope By Sahyadri Pratishant )
अधिक वाचा –
भाऊ हे कधी झालं? पवनमावळमधल्या जवण ते तुंग मार्गावर अनेक गावांचे विनामागणी नामांतर; नागरिकांना फुकटचा मनस्ताप
आदर्श शिक्षक मारुती ठोंबरे यांच्या प्रयत्नातून तुंग शाळेला पंचायत समितीचा ‘उपक्रमशील शाळा पुरस्कार’