Dainik Maval News : आंबेवाडी, कान्हे (ता. मावळ) येथील वैभव उमेश सातकर (वय 23) या तरूणाच्या खून प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे.
मंगळवार, दिनांक १ एप्रिल रोजी पाऊणे आठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उमेश हरिभाऊ सातकर (वय ५३, रा. आंबेवाडी, कान्हे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी, आरोपी अंकुश जयवंत सातकर (रा. आंबेवाडी, कान्हे) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी सोपान रामचंद्र खेंगले (वय ६५, रा. निगडे, ता. मावळ) याना अटक केली आहे. तसेच एक विधिसंघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
- पोलीस निरिक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खुनाचे मुख्य कारण हे संशयित अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले आहे. आरोपी अंकुश जयवंत सातकर याला संशय होता की, मृत वैभव सातकर याचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत. या संशयातून त्याने आपल्या साथीदारांसह धारदार शस्त्राने वैभवच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, पाठीवर वार करीत त्याचा निर्घृण खून केला.
ही घटना आंबेवाडी, कान्हे येथील सातकर यांच्या शेतातील गोठ्याच्या शेजारी असलेल्या रामदास चंदू सातकर यांच्या मालकीच्या गट नंबर ५३९ मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News