व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; कुदळवाडी येथील युवकाचा कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडून मृत्यू । Maval News

इंदुरी जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरूणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
youth from Kudalwadi drowned in Indrayani river at Kundamala Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंदुरी जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरूणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, बुधवारी (दि.2 एप्रिल) रोजी घडली. अमन शफी रेहमानी (वय 21 वर्षे, रा. कुदळवाडी, चिखली) असे बुडून मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुदळवाडी, चिखली येथील मित्रांचा एक ग्रुप कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता. त्यातील चार पाच जण पोहण्यासाठी इंद्रायणीच्या पाण्यात उतरले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीन जण बुडू लागले. त्यातील दोन जणांना वाचविण्यात यश आले, परंतु अमनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

  • घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले. साधारण पाचच्या सुमारास तरूण बुडाला होता, आपदा मित्रांनी अथक प्रयत्न करून सहा वाजेपर्यंत त्याला पाण्याबाहेर काढले. उपचारासाठी त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

स्थानिक ग्रामस्थांसह आपदा मित्र मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे निलेश गराडे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, रवी कोळी, विनय सावंत, सागर भेगडे, अनिश गराडे यांनी शोधकार्यात मदत केली. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव व त्यांचे सहकारी याप्रसंगी उपस्थित होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, ह्या दुर्दैवी घटनेबद्दल कुंडमळा परिसरात व कुदळवाडी, चिखली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, अमन रेहमानी याच्या आकस्मित निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास (स्क्रॅप) नव्या वाहनासाठी 15 टक्के कर सवलत मिळणार

Next Post

कान्हे येथील वैभव सातकर खून प्रकरणी दोन आरोपींना अटक ; एक अल्पवयीन ताब्यात । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

कान्हे येथील वैभव सातकर खून प्रकरणी दोन आरोपींना अटक ; एक अल्पवयीन ताब्यात । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
water scarcity in Dhalewadi-Malewadi village stage lock the office protest at Mahagaon Gram Panchayat Maval

धालेवाडी-मालेवाडीत तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

November 17, 2026
Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
Locals oppose supplying water from Thokalwadi Dam Maval to Pimpri-Chinchwad

‘ठोकळवाडी’चे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास स्थानिकांचा विरोध ; धरणग्रस्तांचा ऐतिहासिक संघर्ष, शेतीच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार

November 14, 2026
discussions on development issues in Takve-Vadeshwar ZP Gat initiative by Zilla Parishad Pune

जनतेच्या दारात प्रशासन; टाकवे-वडेश्वर गटात विकासाच्या प्रश्नांवर थेट चर्चा, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम

November 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.