Dainik Maval News : जागेच्या वादातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी सोमाटणे फाटा येथे घडली. विजय चंद्रकांत लांडे (वय ३९, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमाकांत मिश्रा, त्याची पत्नी, मेहुणा आणि मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय लांडे आणि विनोद प्रभाकर मालपोटे यांच्यासोबत आरोपींनी जागेच्या मालकी वरून वाद केला. त्यातून विजय लांडे आणि विनोद मालपोटे यांना लोखंडी पाइपने मारून जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’