मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील दोन विद्यार्थींनी इयत्ता आठवी पुर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. यामध्ये कु. समृद्धी राहुल काळे आणि कु. प्रणाली दिपक नरवडे या विद्यार्थींनींने पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत आपली चमक दाखवली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे उमेश इंगुळकर यांचे देखील अभिनंदन होत आहे. या यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे गुरुजी, नविन समर्थ विद्यालयाचे समिती अध्यक्ष महेशभाई शहा, मुख्याध्यापक संजय वंजारे यांनी शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान केला. ( Two students of Ekvira Vidya Mandir School in district merit list in scholarship examination )
दोन्हीही विद्यार्थांंनीने गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, सरंपच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, संस्था संचालक मंडळ यासह सर्व कार्ला ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थांनकडून अभिनंदन होत आहे.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम ! नवयुग सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मदतीचा हात’ । Maval News
– पीडीसीसी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 शाळांना शैक्षणिक मदत; ‘या’ विद्यालयांना शालेय साहित्यांसाठी धनादेशांचे वाटप
– पोल्ट्री व्यावसायिकांचा एल्गार, ‘या’ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा, वाचा काय आहेत मागण्या