लोणावळा शहरात सोमवार (27 फेब्रुवारी) रात्री 12.10 च्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातात दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याबाबत लोणावळा शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस हवालदार नितेंद्र रामचंद्र कदम आणि वाहन चालक पोहवा फरांदे यांना रिदम हॉटेल समोर जुना मुंबई पुणे हायवे रोडवर दोन अनोळखी व्यक्ती पुणे लेनवर बेशुध्द अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. तसेच त्यांची मोटार सायकल (क्रमांक MH 06 AM 6395) ही पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या लेनच्या बाजूला पडलेली होती. ( Two Unidentified Bikers Died In Road Accident At Midnight In Lonavala City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तेव्हा दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमीपैकी एकाला उपचारासाठी रुग्णवाहिका चालक प्रमोद पवार यांच्यासह महावीर हॉस्पिटल कामशेत येथे उपचारासाठी पाठवले. तर दुसऱ्या जखमी व्यक्ती (अंदाजे वय 30 वर्षे) याला उपचारासाठी सपना हॉस्पिटल खंडाळा इथे नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
तसेच, त्यावेळी महावीर हॉस्पिटल कामशेत येथील डॉक्टर विकेश मुथ्था यांनी रात्री अडीचच्या सुमारास दुसऱ्या अनोळखी जखमी व्यक्तीही ( अंदाजे 28 वर्षे ) उपचार दरम्यान 12.45 सुमारास मृत पावला, असे कळवले. सदर जखमीला गंभीर मार लागल्याने तो मृत पावला. दोन्ही अनोळखी व्यक्ती या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत पावल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोहवा शकिल शेख हे करीत आहेत.
अधिक वाचा –
– घरातून निघून गेलेल्या तरुणाचा तळेगाव दाभाडे शहरातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ
– नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या