मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव कातवी शहरातील महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ह्या शिबिराचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगरसेविका पुनम जाधव, संचालिका सुषमा जाजू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. टू व्हीलर प्रशिक्षण सरावाला शुक्रवार (दिनांक 5 जानेवारी 2024) पासून सलग दहा दिवस दररोज सकाळी 9 ते 5 या वेळेत हाॅटेल अक्षय पॅलेस जवळील मैदानात सुरुवात होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव मावळ शहरातील महिला प्रशिक्षणार्थी यांना पुढील दहा दिवसांत अतिशय अल्पदरात महिला प्रशिक्षका टू व्हीलर ट्रेनिंग देणार आहेत. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स सुद्धा काढून देण्यात येणार आहे. यासाठी वडगाव शहरातील महाराजा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. वडगाव शहरात प्रथमच महिलांसाठी होत असलेल्या टू व्हिलर प्रशिक्षणात सुमारे 200 हून अधिक महिला प्रशिक्षणार्थींनी मोरया प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी केली आहे. यापुढील कालावधीतही हि नावनोंदणी सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. ( two wheeler driving training camp for women section through morya pratishthan in vadgaon maval city )
ह्यावेळी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगरसेविका पूनम जाधव, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, संचालिका सुषमा जाजू, कविता नखाते, जयश्री जेरातगी, नयना भोसले, प्रशिक्षक शितल जाधव, स्मिता कांबळे आदींसह प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका आणि महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– पुढील 5 वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी । Vadgaon Nagar Panchayat
– आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election
– पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद; तब्बल 36 हजार नागरिकांनी घेतला सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra