लोणावळा जवळ रेल्वे अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवार (दिनांक 21 जानेवारी) रोजी खंडाळा ते मंकीहील दरम्यान धावत्या रेल्वेची धडक बसून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ( Unidentified Person Was Killed In Collision With Rrunning Train Between Khandala And Monkey Hill Point Near Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत व्यक्तीबद्दल माहिती – वय अंदाजे 50 ते 55 वर्षे, उंची 5 फूट 8 इंच. रंगाने गहु वर्ण, चेहरा उभट, बांधा किरकोळ, दाढी आणि डोक्याचे केस पांढरे वाढलेले, कपाळ मोठे असे मृताचे वर्णन आहे. तसेच मृताच्या अंगात काळ्या रंगाचा पूर्ण बाह्याचा स्वेटर आणि चॉकलेटी रंगाची हाफ बर्म्युडा पँट आहे. सदर व्यक्तीविषयी कुणाला माहिती असल्यास किंवा त्याच्या वारसाने रेल्वे पोलीस अधिकारी अनिल जाधव यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– माळवाडीत पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराला पक्षीमित्रांकडून जीवदान । Talegaon Dabhade
– मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात जुणा आणि जवळचा सहकारी काळाच्या पडद्याआड