केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगाल येथील सिलीगुडी येथे एका सरकारी कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांची तब्येत अचानक खालावल्याची माहिती समोर येत आहे. गडकरी यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना कार्यक्रम मध्येच सोडावा लागला. ( Union Minister Nitin Gadkari Falls Sick During Event In Siluguri West Bengal )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari Health Update ) यांच्या हस्ते आज (गुरुवारी, 17 नोव्हेंबर) सिलीगुडीच्या दागापूरमध्ये अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम सुरु असतानाच त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले. परंतू, आरामासाठी नितीन गडकरींचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. ( Union Minister Nitin Gadkari Falls Sick )
अधिक वाचा –
– सुमा शिरूर यांच्या रुपाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय पुरस्काराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सन्मान
– महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विशेष लक्ष द्या; पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या सुचना
– पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्याची खासदार बारणेंची मागणी