मावळ तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास सर्वदूर अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. खासकरुन पवन मावळसह आंदर मावळ भागात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. हवामान खात्याच्या पूर्व इशाऱ्यानुसार रविवारी (9 एप्रिल) मावळ तालुक्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. मात्र, या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आंदर मावळ भागातील कल्हाट, टाकवे बुद्रूक भागातील अनेक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कल्हाट भागातील बागायत शेतीधारकांचे या पावसाने मोठे नुकसान केले आहे. कांदा पिक या पावसाच्या तडाख्यात सापडले आहे. ( unseasonal rain in andar maval area damage to agriculture and flower farmer pune district )
तसेच, आंदर मावळ भागातील टाकवे बुद्रुक, पवळे वाडी भागातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसात मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या शेडचे नुकसान झाले असून काही ठिकाणी शेड उखडल्याचे दिसत असून काही ठिकाणी शेडवरील कागद आणि अन्य साहित्या उडून गेले आहे. हे मोठे आर्थिक नुकसान सदर कृषी व्यवसायिकांचे झालेले आहे.
हेही वाचा – पवन मावळ भागाला अवकाळी पावसाने झोडपले, गारपिटीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान, पंचनामे त्वरित करण्याची मागणी
निसर्गाच्या या रौद्र रुपाने बळीराजासह अनेक सामान्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने अधिकाऱ्यांकरवे तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहे. ( unseasonal rain in andar maval area damage to agriculture and flower farmer pune district )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर
– वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण, आमदार शेळकेंची उपस्थिती