हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी (दिनांक 16 मार्च) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. पुणे जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून मावळ तालुक्यातही जोरदार पाऊस बरसला. मावळ तालुक्यात मंगळवार, बुधवार, गुरुवार असा सलग तीन दिवस अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला आहे. पैकी गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने पवनमावळ भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ( Unseasonal Rain in Maval Taluka Pune Damage To agriculture And Brick Business In Pavan Mawal Area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दोन ते तीन तास झालेल्या जोरदार पावसाने पवनमावळ भागातील पवना धरणाच्या काठी असलेल्या अनेक गावांना अवकाळीचा जोरदार फटका बसला आहे. भर उन्हाळ्यात ओढ्यांना पाणी आले असून पावसाळ्यात भातलावणीला शेतात पाणी साठावे अशी शेतं-वावरं जलमय झाली. तसेच काही भागात गारपीट देखील झाली आहे. पवनमावळातील आजिवली, शिळींब, चावसर, मोरवे, तुंग आणि आसपासच्या गावे, वाड्या वस्त्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचा शेतमाल भिजल्याने बळीराजा मोठा संकटात सापडला आहे, अशी माहिती शिळींब गावातील नागरिक बाजीराव ढमाले यांनी दैनिक मावळला दिली.
शेतकरी संकटात!
सध्या रबी हंगामातील पिक काढणीला आली आहे. या हंगानमात पवन मावळ भागातील शेतकरी अनेक तृणधान्य, कडधान्ये यांचे पिक घेत असतात. मात्र अवकाळी पावसाने काढणीला आलेली ही पिके ओली होऊन खराब झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. यासह साठवलेले सरपन, गौऱ्या, पेंढा आदी भिजल्याने आगामी काळात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकट ओढावणार आहे.
वीट व्यावसायिकांना फटका!
अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांपाठोपाठ विट व्यावसायिकांनाही बसला आहे. लागोपाठ तीन दिवसांपासून कोसळणारा अवकाळी यामुळे बनवलेल्या वीट भिजल्याने अनेक वीट व्यावसायिकांचे काहींचे हजारो तर काहींचे लाखाच्या घरात नुकसान झाले आहे, अशी माहिती शंकर दरेकर, शुभम दरेकर यांनी दिली. Unseasonal Rain in Maval Taluka Pune Damage To agriculture And Brick Business In Pavan Mawal Area Farmers In Trouble Video )
अधिक वाचा –
– ‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके
– रविंद्र भेगडे यांचे 2024 च्या विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट मत – व्हिडिओ
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार