Dainik Maval News : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी (दि.4) पुणे जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. मावळ तालुक्यात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ( Unseasonal rain in Maval taluka )
सोमाटणे, तळेगाव, वडगाव, कामशेत, कार्ला, लोणावळा सह ग्रामीण भागातही अवकाळीच्या सर कोसळल्या. अचानक दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. अनेक ठिकाणी परिसर जलमय होईल, इतका पाऊस झाला.
गेले काही आठवडे जाणवत असलेल्या तीव्र उष्म्यानंतर व दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी दुपारपासून काही भागात अवकाळी पावसास सुरूवात झाली. ते सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत होता.
ग्रामीण भागातही पावसाचा तडाखा
शहरी भाग व औद्योगिक पट्ट्यासह मावळातील आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळातील काही भागात शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सर कोसळल्या. रब्बी हंगामातील पिकांची काढणी जवळपास पूर्ण झाल्याने व पिकांची काढणी सुरू असल्याने शेतमाल नुकसानीच्या अधिक घटना काही समोर आल्या नाही, परंतु अनेक ठिकाणी पाणी साठले होते.
वातावरणात थंडावा
दरम्यान गेले अनेक दिवस वातावरणात असणारी उष्णता शुक्रवारच्या पावसामुळे काहीसी कमी झाली होती. सर्वदूर पावसाच्या शिडकाव्याने तापलेली धरती व घरे ओलाव्यामुळे थंड झाली, तसेच मावळतीच्या वेळीही थंड वारे वाहू लागल्याने वातावणात गारवा निर्माण झाला होता.
लोणावळ्यात 28 मीमी पाऊस
लोणावळा शहर व घाट परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. अवघ्या काही तासात झालेल्या पावसामुळे लोणावळ्यात काल (दि.4) 28 मीमी पावसाची नोंद झाली, एकूण 1.10 इंच सेंट पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान पाऊस व ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे द्रुतगती मार्ग आणि महामार्गावर वाहन चालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. एक्सप्रेस हायवेवर व बोगद्यात वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number