व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात

महाराष्ट्रातील काही भागात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 27, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Unseasonal-Rain

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्रातील काही भागात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी, दि. 25 नोव्हेंबर आणि आज रविवार, दि. 26 नोव्हेंबर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बरसला. काही भागात तर गारपीट झाल्याचीही माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रविवारी दिवसभर वातावरण काहीसे ढगाळ राहिल्याचे दिसले. अखेरीस रविवारी सायंकाळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस झाला. मावळ तालुक्यातही अत्यंत जोरदार पाऊस झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ भागात रविवारी सायंकाळी अतिमुसळधार स्वरुपातील पाऊस बरसला. साधारण अर्धा तास – तासभर झालेल्या अवकाळीने नागरिकांची दाणादाण उडवली. ऐन संध्याकाळी आणि त्यातही रविवारी झालेल्या पावसाने बाजारपेठ भागात नागरिकांची मोठी धांदल उडाली. तसेच मुसळधार पावसामुळे काही भागात वीज गायब झाल्याचेही चित्र दिसून आले. वडगाव मावळसह कामशेत, तळेगाव, लोणावळा या शहरी ठिकाणी आणि आंदर मावळ, पवनमावळ अशा सर्वदूर भागात पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे.

मावळ तालुक्यात सध्या भाताची काढणी सुरु आहे. अशा परिस्थितीत हाता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आताचा अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे. वर्षभर ज्या पिकाच्या भरवशावर अवलंबून राहावे, त्याच पिकाच्या ऐन काढणीवेळी अवकाळीचा फेरा आल्याने शेतकरी मोठा चिंतेच्या खाईत कोसळला आहे. ( Unseasonal Rain In Maval Taluka Rain Update Pune )

अधिक वाचा –
– भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका, घरबसल्या ‘असा’ करा भाडे करार
– जांबवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
– भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मावळ तालुक्यात येणार, वाचा अधिक


Previous Post

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade

Next Post

तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bjp-maval

तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Our Gaurai Our Pride Prashantdada Bhagwat Yuva Manch organizes home Gauri Ganpati decoration competition

आमची गौराई…आमचा अभिमान! प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद

August 31, 2025
The term of the genealogy committee formed for the Maratha community has been extended till June 30

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

August 31, 2025
Pimpri-Chinchwad-RTO

गौरी पूजनानिमित्त सोमवार १ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद राहणार

August 31, 2025
Pune District Development Coordination and Monitoring Committee review meeting concluded

पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न ; जिल्ह्यात कचरा प्रक्रियासाठी १० प्रकल्प सुरु होणार । Pune News

August 31, 2025
Appeal to colleges to submit applications for Aaple Sarkar Seva Kendra

आपले सरकार सेवा केंद्राकरिता महाविद्यालयाने अर्ज सादर करण्याचे आवाहन

August 31, 2025
Unity of youth through Ganeshotsav is necessary for social development said ACP Vikas Kumbhar

गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार

August 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.