वडगाव शहराच्या भौगोलिक परिस्थितीमुळे असलेले नैसर्गिक ओढे आणि मानवी वस्त्यांमधून उत्तर दिशेकडे प्रवाह असलेल्या नाल्यांमध्ये वाहत आलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, निर्माल्य, झाडांच्या फांद्या-पालापाचोळा आणि काठावरील इमारतींचे बांधकाम करत असताना वाया गेलेला मलबा यामुळे ओढे आणि नाले तुंबले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
परिणामी मैला आणि सांडपाणी मिश्रित पाण्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे पावसाळ्यात शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत आहे. म्हणून शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने शहरातून जाणाऱ्या नैसर्गिक ओढे व नाल्यांमधील राडारोडा तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपा महीला मोर्चाने ने नगरपंचायतकडे केली आहे. ( Vadgaon BJP Latter to Nagar Panchayat regarding cleanliness and waste accumulated in streams and drains of city )
निवेदनामध्ये वडगाव प्रभाग क्रमांक 13, 14 व 14 च्या पश्चिम बाजूने वाहत कृषी संशोधन केंद्राच्या ओढ्यास जाऊन मिळणाऱ्या ओढ्याचा विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. भारतीय जनता पार्टी वडगाव शहर महीला मोर्चा अध्यक्ष धनश्री शंकर भोंडवे यांच्यासह सरचिटणीस वैशाली प्रमोद म्हाळसकर, संगीता चंद्रकांत ढोरे, आश्विनी भाग्येश बवरे, श्रेया पवन भंडारी, सुनिता दत्तात्रय जाधव, सुमन हिरामण खेंगले, संगीता ज्ञानेश्वर खेंगले आदी महिला याप्रसंगी उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर
– शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन संपन्न; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश