वडगाव मावळ शहराजवळील जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याची झालेली दुरावस्था, याबाबत पुणे येथील रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर उपस्थित होते. ( Vadgaon Maval BJP Latter To MSRDC Regarding Bad Condition Of Service Road )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘वडगाव शहरामधील राष्ट्रीय महामार्गलगत सेवा रस्त्यावरील झालेल्या दुरावस्थेबाबत जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. सेवा रस्त्याला लागून आयआरबीच्या अंतर्गत एनएच 4 (NH 4) हा जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग असून सदर सेवा रस्त्याचा विषय हा रस्ते विकास महामंडळ मर्यादित, पुणे या खात्याशी संबंधित असल्यामुळे एमएसआरडीसीला निवेदन देत सदर ठिकाणची चालू दयनीय परिस्थिती लक्षात आणून दिल्याचे भाजप वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले.
‘वडगाव मधील सेवा रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, कामगार वर्ग ये-जा करत आहेत. सदर ठिकाणी रोडचे काम अपूर्ण आहे. ड्रेनेज लाईनचे काम केले गेलेले नाही. लाईट ची व्यवस्था नाही. रस्ता दुभाजकावर गवत वाढलेले आहे, अशा अनेक समस्या या रस्त्याबाबत निर्माण झालेल्या आहेत. भविष्य काळात आपल्या अपुऱ्या सुविधेमुळे सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तरी आपण या निवेदनाद्वारे या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा भाजपा वडगाव शहराचे वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन आपल्या खाते विरोधात करण्यात येईल. रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा भाजपाकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– शिवसेना अवजड वाहतूक सेनेतर्फे आयआरबी प्रशासनाला सज्जड इशारा, ‘सुविधा द्या नाहीतर…’
– मावळात हे काय सुरूये? तळेगाव दाभाडेत भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख लंपास
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडेजवळील घोराडेश्वर इथे दीडशे फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू