वडगाव मधील श्री पोटोबा महाराज देवस्थान येथे आयोजित कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवाची सांगता गुरूवार (दि 17 नोव्हेंबर) रोजी भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी वाणीभूषण ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे (ओतूर, श्री क्षेत्र ओझर) यांचे काल्याचे कीर्तन झाली. ( Vadgaon Maval Kal Bhairav Jayanti Utsav Concluded With Ganesh Maharaj Waghmare Kirtan )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यानंतर दुसरे दिवशी, कार्तिक कृष्ण प्रतिपदेला या उत्सवाची वडगावमध्ये सुरूवात होत असते. यावर्षी देवस्थान संस्थानने श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा (कैवल्याचा पुतळा) या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन केले होते. उत्सव काळात भाविकांनी अभिषेक, महापूजा आरती, कथा, हरिपाठ श्रवणाचा आनंद घेतला. कथाकार वाणीभूषण हभप गणेश महाराज वाघमारे यांनी कैवल्याचा पुतळा कथेचे आणि कालभैरव देवजन्म कीर्तनाचे सुंदर निरूपण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.
महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानचे विश्वस्त ऍड तुकाराम पंढरीनाथ काटे यांच्या परिवाराचे वतीने करण्यात आली होती. तसेच मंदिराला भव्य आकर्षक लाईटिंग भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर यांचे वतीने करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, पुजारी समीर गुरव आदींसह ग्रामस्थ यांनी केले. ( Vadgaon Maval Kal Bhairav Jayanti Utsav Concluded With Ganesh Maharaj Waghmare Kirtan )
अधिक वाचा –
– मतदार यादीत नाव नसलेले शेतकरीही लढवू शकतात बाजार समितीची निवडणूक; वाचा मंत्रिमंडळाने घेतलेले 15 निर्णय एका क्लिकवर
– मुंढावरे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्याचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश