व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…जिवाभावाच्या मित्रांसाठी महाबळेश्वर एकदम ओक्के!! । Vadgaon Maval

काय ते महाबळेश्वर, काय ते वातावरण, काय ती झाडी, काय ती थंडी, सगळे ओके म्हणत वडगाव शहरातील युवकांनी घेतला महाबळेश्वर ट्रीप चा आनंद.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
vadgaon-maval-Sunil-Dhore

Photo Courtesy : Vijay Surana


सह्याद्री फाउंडेशन माध्यमातून एक दिवसीय ट्रीप चे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल ढोरे आणि नगरसेवक मंगेश खैरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून ताण तणाव  कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात महाबळेश्वर येथील थंड हवेच्या ठिकाणी वडगाव शहरातील 125 युवकांनी या ट्रीपचा आनंद घेतला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पैसा अनेकांकडे आहे पण  निस्वार्थी पणे खर्च करण्याची दानत कमी लोकांकडे असते. काहीजन खर्च करतात पण हतचा राखून. असं म्हटलं जातं की राजकारणातील प्रत्येक व्यक्ती ही जेव्हा खर्च करते त्यावेळी त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. मात्र, याउलट सुनील ढोरे यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता जीवाभावाच्या युवकांना घेवून महाबळेश्वर ट्रीपला नेले. राहायची सोय, नाश्ता पासून ते जेवणा पर्यंत उत्तम सोय केली. एवढेच नाही तर सायंकाळी रम्य वातावरणात ऑरस्केस्टा देखील ठेवला होता. हिंदी मराठी गाण्यांची मैफील ऐकण्याचा आनंद सगळ्यांनी लुटला. सुनील ढोरे यांचा स्वभाव, निस्वार्थी पणा, प्रत्येकाला मदत करणे त्यामुळे वडगाव शहरातील तरूण पिढी त्यांच्या भागे भक्कमपणाने उभी आहे. ( Vadgaon Maval NCP Sunil Dhore Birthday Special Mahabaleshwar Trip For Friends )

आमदार सुनील शेळके यांनी दिल्या शुभेच्छा  –

आमदार सुनील शेळके, गणेश खांडगे,  विठ्ठलराव शिंदे व अन्य पदाधिकारी येणार होते. परंतू लग्न सोहळे,  कृषी उत्पन्न बाजार निवडणुक त्यामुळे त्याना येता आले नाही. व्हिडिओ वरून आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले सुनील ढोरे यांचे समाज कार्याला तोड नाही. त्यामुळे आज युवकांचा संच त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. माझी येण्याची खूप इच्छा होती, पण कामामुळे येता आले नाही. सुनील व त्यांच्या सर्व सहका-यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या आशा अकांशा पूर्ण होवो ही पोटोबा महाराज यांच्या जवळ प्रार्थना करतो. यावेळी  गणेश खांडगे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

मी जे काही करतो ते केवळ मित्रांसाठी – सुनील ढोरे 

मी ही ट्रीप नेली. ही कोणतेही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेली नाही. जीवाभावाचे मित्र आहेत, त्यांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी महाबळेश्वर ट्रीप नेली. आगामी काळात माझ्या सह्याद्री फांऊडेशन व जीवाभावाचे मित्र यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मागे भक्कम पणाने उभा राहून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जय मल्हार हाॅटेलचे मालक किरण ढोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सुनील ढोरे, मंगेश खैरे, विजय सुराणा, चंद्रजीत वाघमारे, राजेश बाफना, विशाल वहिले, राहूल ढोरे, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे, शरद ढोरे, विकी ढोरे, आनंद बाफना, भाऊ कराळे, प्रविण ढोरे, अलताफ सैय्यद, गणेश माळसकर, संभाजी येळवंडे, राजेश ढोरे, सचिन वाडेकर, राहुल ढोरे, आबा ढोरे, अमोल ढोरे, गणेश ढोरे, विशाल चव्हाण, मयूर गुरव, अतुल ढोरे, जयदीप ढोरे, तुषार वहिले, राकेश वहीले, अनील कोद्रे यांच्या सह आदी जन उपस्थित होते.

अधिक वाचा –
– कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 16 जोडपी विवाहबद्ध; हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ
– कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : पक्षविरोधी काम केल्याने पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी


Previous Post

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 16 जोडपी विवाहबद्ध; हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ

Next Post

मौजे जांबवडे गावात नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचे लोकार्पण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
jambawade-village-maval

मौजे जांबवडे गावात नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.