स्वतःजवळ गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. सागर किसन गराडे (वय 22), सुशांत सुरेश सुतार (वय 22) दोघेही राहणार जांभूळ (ता. मावळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार श्रीशैल कंटोळी यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळ गावच्या हद्दीत मरीमाता मंदिराजवळ सागर किसन गराडे याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली. सागरकडे चौकशी केली असता हे पिस्टल सुशांत सुतार याने त्याच्याकडे असलेल्या पिस्टलांपैकी एक असून दोन काडतुसे त्याने माझ्याकडे दिली, असे सांगितले. या प्रकरणी सहायक फौजदार जावळे तपास करत आहेत. ( Vadgaon Maval Police Arrested Two Youth with Gavathi pistol and Kadtus )
अधिक वाचा –
– आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लायन्स क्लबने दिले विमा कवच । Khopoli News
– पुणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रीप्रकरणी 284 गुन्ह्यांची नोंद, 242 आरोपी अटकेत तर 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
– तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप