देशात सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर बंदी घातलेली असतानाही अनेक ठिकाणी अशा प्लॅस्टिकचा वारेमाप वापर होताना दिसतो. प्रशासनाची नजर चोरून या प्लॅस्टिक घटकांचा पिशव्यांचा वापर होत असतो. वडगाव मावळ शहरात कचरा व्यवस्थापन करताना विघटन न होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत असल्याने या विरोधात आता नगरपंचायत विभागाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याच मोहिमेचा एक भाग म्हणून वडगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्या आदेशानुसार आणि उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी (दिनांक 27 एप्रिल) वडगाव शहरातील आठवडे बाजाराच्या दिवशी मुक्तपणे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ( Vadgaon Nagar Panchayat administration action against those who use plastic bags in the weekly market )
वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या पथकाने सायली म्हाळसकर यांच्या नेतृत्वात बाजारातील पथारी धारक, फळ आणि भाजी विक्रेते यांच्या ठिकाणी छापा मारत कारवाई केली. यावेळी नगरपंचायत पथकाने शासनाकडून प्रतिबंधित असलेले जवळपास 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जर कुणी सिंगल-युज प्लास्टिकचा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असतानाही शहरातील अनेक ठिकाणी सिंगल-युज प्लास्टिकचा खुलेआम वापर केला जात आहे, त्यामुळे आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे सायली म्हाळसकर यांनी सांगितले.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– जर्मनीच्या अधिकाऱ्यांची थेट वडगाव मावळमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; 1,590 मतदारांनी बजावला हक्क, शनिवारी मतमोजणी