वडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक आज (बुधवार, दिनांक 19 एप्रिल) उपनगराध्यक्षा तथा सभापती, पाणीपुरवठा विभाग सायली म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी. नगरसेवकांकडून शहरातील पाणी विषयक समस्या व प्रश्न जाणून घेऊन खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, पूजा वहिले, दिलीप म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर, मंगेश खैरे तसेच पाणी पुरवठा विभाग कर्मचारी उपस्थित होते. ( vadgaon nagar panchayat will conduct water audit of tap water supply in all wards said Saili Mhalaskar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
- शहरातील सर्व प्रभागात ठरवलेल्या वेळेप्रमाणे पाणी पुरवठा होतो का व किती वेळ यांची माहिती घेण्यात आली.
- नळ कनेक्शनसाठी नगरपंचायत कडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जधारकांना त्वरित नळ जोडणी करून देण्यात येणार मात्र पाणीपुरवठा विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना नियमबाह्य नळ जोडणी करून दिली जाणार नाही.
- प्रभागातील कोणती ही पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी नगरसेवकांना संबंधित खात्यातील मा.सभापती, अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळवावे लागणार तसेच पाहणी दौरा झाल्यानंतर त्या कामास परवानगी दिली जाणार.
- ज्या मालमत्ता धारकांचा कर थकीत आहे आशा धारकांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई चालू करण्यात येणार.
- सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विभाग पथकाकडून वॉटर ऑडिट केले जाणार दरम्यान आढळणाऱ्या अनाधिकृत व नियमबाह्य नळ कनेक्शन त्वरित तोडण्यात येणार
- पाणीपुरवठा बाबत समस्या व तक्रारीसाठी विभागाच्या अधिकृत ग्रुपचा स्थापना करण्यात येणार व पाण्याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार.
- शहरातील सर्व झाडे व वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी विभागाकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात येणार.
- उन्हाळ्यात पाण्याचा वापर जपून करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा, याबाबत सर्व नगरसेवकांनी आप आपल्या प्रभागांमध्ये जनजागृती करावी तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आली.
- पाणीपुरवठ्या बाबतची दोन लाख रुपये पर्यंतच्या खर्चाची कामे नगरसेवकांकडून पाणीपुरवठा विभागाकडे मागविण्यात आली.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वडगावमधील मटका जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंच्या मुद्देमालासह 10 जण ताब्यात
– बिबट्या आला रे…! किल्ले तुंग परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – पाहा व्हिडिओ