पवन मावळ भागातील किल्ले तुंग पायथ्याशी असणाऱ्या क्लब महिंद्रा रिसॉर्ट तुंगी इथे मंगळवारी (दिनांक 19 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली. काही आठवड्यांपूर्वी पानसोली इथे एका बिबट्याला जेरबंद कऱण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिकांनी धाडसाने बिबट्याचा वावर कॅमेरात कैद केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुदर्शन पाठारे यांनी दैनिक मावळला हि माहिती दिली. देविदास लोहेकर, शंकर आखाडे ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत पाठारे आदींनी बिबट्या पाहिल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी धाडसाने हा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. पण हे धाडस अंगलटही आले असते. ग्रामस्थ महादु ठोंबरे यांनी यापूर्वीही या भागात बिबट्या आढळल्याचे दैनिक मावळशी बोलताना सांगितले. ( leopard seen near tung fort in club mahindra resorts area watch video )
या घटनेची माहिती मिळताच RFO हनुमंत जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी डोमे मॅडम, शिरसाट मॅडम आणि इतर वन्य कर्मचारी होते. नागरिकांनी घाबरुन न जाता “काय करावे आणि काय करु नये” याबाबत जनजागृती केली. तसेच हा भाग वनांनी वेढलेला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, रात्री अपरात्री लहान मुलांना घेऊन गरज नसताना बाहेर पडू नये, तसेच बिबट्या दिसल्यास अनावश्यक धाडस करु नये, याची माहिती नागरिकांना दिल्याचे RFO हनुमंत जाधव यांनी दैनिक मावळला सांगितले.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वडगावमधील मटका जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंच्या मुद्देमालासह 10 जण ताब्यात
– रबरासारखं शरीर असलेले चिमुकले योगा मास्टर्स आर्यन अन् वेदांगी; राज्यभर गाजवतायेत मावळ तालुक्याचं नाव