वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी तालुक्यातून अनेक ठिकाणाहून नागरिकांची वर्दळ होत असते. प्रामुख्याने तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक, तलाठी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, शाळा , महाविद्यालय, बाजारपेठ अशी अनेक मुख्य शासकिय कार्यालय आहे. तालुक्यातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कामांसाठी येत असतात, परंतु गेल्या दहा दिवसांपासून वडगाव शहरात दिवसा व रात्री लाईट जाण्याचे प्रमाण वारंवार होत असून याचा व्यवसायावर देखील परिणाम होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
व्यापारी वर्ग, शालेय विद्यार्थी, महिला व नागरिक हे वारंवार लाईट जात असल्यामुळे त्रस्त होत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु होत असल्याने रात्रीच्या वेळी चोऱ्या देखील घडू शकतात. संपुर्ण वडगाव शहरातील विज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी रात्रीच्या वेळी देखील एक वायरमन कर्मचारी द्यावा. दर महिन्याला येणारे लाईट बिल देखील नागरिकांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना दंडाला सामोरे जावे लागत आहे, वेळेवर बिल न आल्याने नाहक त्रास होत आहे. ( Vadgaon NCP letter to mahavitaran office regarding continuous interruption of power supply )
यापुढील काळात आपल्या महावितरण कंपनी कडून योग्य ती काळजी घेण्यात यावी, नाही तर पुढील काळात महावितरण कार्यालयावर वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने मोर्चा काढुन कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन महावितरण अभियंता शाम दिवटे साहेब यांना देण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष प्रविण ढोरे, पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, शहर कार्याध्यक्ष सुरेश जांभूळकर, मा. उपसरपंच अविनाश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संतोष खैरे, शैलेश वहिले, तुषार वहिले, गणेश ढोरे, भाऊसाहेब ढोरे, मयुर गुरव, मजहर सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणेंच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन