वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले यांची, तर व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. 27 जून) सहायक निबंधक कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे मावळते चेअरमन निलेश म्हाळसकर आणि व्हाईस चेअरमन राजेंद्र भालेराव यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी विशेष सभा बोलावण्यात आली. ( Vadgaon Society Election Maval Taluka )
विहित मुदतेत चेअरमन पदासाठी किसनराव वहिले यांचा, तर व्हाईस चेअरमन पदासाठी गणेश भालेकर यांचा एकमेव अर्ज आला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने चेअरमनपदी वहिले आणि व्हाईस चेअरमनपदी भालेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी निवडणूक सहायक म्हणून सोसायटीचे सचिव रमेश गाडे यांनी काम केले.
यावेळी सोसायटीचे संचालक सुभाषराव जाधव, चंद्रकांत ढोरे, प्रकाश कुडे, अजित वहिले, पंढरीनाथ भिलारे, मंगल पिंगळे, मंदाकिनी हिंगे उपस्थित होते. निवडीनंतर माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, नारायण ढोरे, तुकाराम ढोरे, गंगाराम ढोरे, संभाजी म्हाळसकर, प्रवीण ढोरे, विशाल वहिले, अनंता कुडे, अतुल राऊत, बाळासाहेब भालेकर आदींच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
अधिक वाचा –
– सरप्राईज..! मावळ तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळकेंचा सुखद धक्का
– प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात करूंज गावातील नागरिकांचे आमरण उपोषण !
– देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla