मुंबई ते पुणे प्रवास आता आणखीन सुखकर आणि जलद होणार आहे. लवकरच मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हे आणखीन एक गिफ्ट मिळणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही मार्गावर असणारे अनुक्रमे खंडाळा-लोणावळा व इगतपुरी-कसारा या दोन घाट मार्गातून वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ( Vande Bharat Express will run on Mumbai to Solapur route Test completed on Lonavala-Khandala Ghat route Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वंदे भारत एक्सप्रेस….
देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. तसेच पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली.
अधिक वाचा –
– ‘दादा हो… आता तरी दिवे लावा’, वडगाव शहर भाजपाची नगरपंचायतला विनवणी, निवेदनातून वडगावकरांचा अंत न पाहण्याचा सल्ला
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता लोणावळ्यासाठी शिवाजीनगरहून 4 लोकल सुटणार, पाहा वेळापत्रक