Dainik Maval News : तळेगाव दाभाडे ते ओवळे एसटी बस बाबत असणाऱ्या विविध मागण्यांचे निवेदन मागील आठवड्यात स्थानिक पदाधिकारी आणि विद्यार्थी यांच्या वतीने तळेगाव आगार प्रमुख यांना देण्यात आले होते. त्यानंतर दैनिक मावळ मध्येही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि आगारप्रमुख यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यात तळेगाव – ओवळे एसटी बस सेवेतील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले व विद्यार्थी यांनी तळेगाव आगार प्रमुखांना तळेगाव – ओवळे एसटीला होणारी गर्दी, रविवारच्या फेऱ्या पूर्ववत करणे, मुक्कामी एसटी सुरु करणे, मार्गावर चांगली बस पाठविणे आदी विषयांबाबत निवेदन दिले होते. याबाबत मंगळवारी (दि.24) तळेगाव आगार व्यवस्थापक प्रमुख प्रमोद गायतोंडे यांची बाळासाहेब घोटकुले, दत्तात्रेय माळी, गणेश ठाकर, ऋषिकेश कारके यांसोबत बैठक संपन्न झाली.
मान्य झालेल्या मागण्या –
1) सकाळी 6 वाजता आढले ते तळेगाव नवीन एसटी गाडी सुरू करण्यात आली
2) रविवारी सकाळी 10 वाजता एक फेरी व सायंकाळी 4 वाजता एसटी गाडी सुरू करण्यात आली
3) तळेगाव ते ओवळे या गाडीसोबत तळेगाव ते पिंपळखुठे या दोन्ही गाड्या दुपारी 1.30 वाजता सोडण्यात येईल.
4) तळेगाव ते शिवने मार्गे डोने हि एसटी गाडी लवकरात लवकर सोडली जाईल असे आश्वासन दिले.
5) तळेगाव ते ओवळे डेपोतून सोडली जाणारी एसटी ही चांगल्या कंडिशनची सोडली जाईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन । Pimpri-Chinchwad
– ‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी’ । Pavana Dam News
– जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत खोपोलीतील कारमेल स्कूलचे वर्चस्व । Khopoli News