व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड पोलिसांची नवरात्रोत्सव मंडळांसोबत बैठक संपन्न ; नियमांचे पालन करून उत्सव साजरा करा – पो.नि. वाघमारे । Dehu Road News

देहूरोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुमारे 27 नवरात्र उत्सव मंडळे असून 14 मंडळे मिरवणूक काढत असतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 30, 2024
in लोकल, शहर
Dehu Road Police meeting

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळे, नवरात्र उत्सव मंडळ, दुर्गा दौड, पथ-संचलन व शस्त्र पूजन करणाऱ्या संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, नवरात्र उत्सवात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी महिला मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. न्यायालयाच्या व शासनाच्या अटी शर्तींचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद घेवरे यांनी केले.

सार्वजनिक मंडळांनी रस्त्यात अडथळा निर्माण होणार नाही, असे मंडप उभारावे. प्रबोधनात्मक देखावे अथवा फलक लावावे. गरबा खेळण्यासाठी महिला व मुली असल्याने मंडळांनी स्वयंसेवक नेमावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिलांची छेडछाड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महिलांनीही दागदागिने सांभाळावेत. रावण दहन, दुर्गा दौड पथसंचलन आणि शस्त्र पूजन करणाऱ्या संघटनांनी दक्षता घ्यावी, आदी सुचना उपस्थितांना देण्यात आल्या.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त –
देहूरोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुमारे 27 नवरात्र उत्सव मंडळे असून 14 मंडळे मिरवणूक काढत असतात. एक मंडळ महिलांसाठी गरबाचे आयोजन करत असते. देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये 2 पोलीस निरीक्षक, 10 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस अमलदार असून प्रत्येक मंडळाजवळ 2 पोलीस अंमलदार देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार असून गृहरक्षक दलातील जवानही असणार आहेत. सर्व अधिकारी गस्त करणार असून पेट्रोलिंग व मार्शल पोलीस असणार आहेत. न्यायालय व शासनाचे नियमांचे पालन करून शांततेमध्ये उत्सव साजरा करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर
– अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन । Pimpri-Chinchwad
– ‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी’ । Pavana Dam News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव – आढले मार्गावर नवीन एसटी, ओवळे एसटीच्या रविवारी दोन फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश । Maval News

Next Post

तळेगाव नगरपरिषदेतील 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Nagar Parishad

तळेगाव नगरपरिषदेतील 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.