व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना निवडणूकीतून धडा शिकवा’, संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी वरुण सरदेसाई यांची मशाल यात्रा

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात “मशाल यात्रा” काढण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 7, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Mashal Yatra in Pimpri Chinchwad

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात “मशाल यात्रा” काढण्यात आली. युवासेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत हाती मशाल घेऊन असंख्य युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते मशाल पेटवून या मशाल यात्रेची सुरुवात रहाटणीतून करण्यात आली. रहाटणी परिसरानंतर काळेवाडी, अमरदीप कॉलनी, पिंपरी बाराजपेठ, डीलक्स चौक, पिंपरीगाव, पिंपरी सौदागर यासह विविध भागातून मशाल यात्रा काढून प्रचार करण्यात आला. या मशाल यात्रेत “जय भवानी, जय शिवाजी”चा जयघोष करीत हातात मशाली घेऊन युवा सैनिांनी मावळ लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी फक्त मशाल हेच चिन्ह लक्षात ठेवण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. ( Varun Sardesai Mashal Yatra in Pimpri Chinchwad to campaign for Maval Lok Sabha candidate Sanjog Waghere )

वरुण सरदेसाई यांच्यासोबत या यात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड . सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी चेतन पवार, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य योगेश निमसे, गुलाब गरुड, दस्तगीर मणियार यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सैनेचे पदाधिकारी, युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले होते.

‘उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांना गाडण्याचा संदेश दिला आहे. तो संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. गद्दारी करणा-यांना आणि उध्दव ठाकरे यांना त्रास देणा-यांना या निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे. मतदारसंघात मशाल पेटवून संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करायचे आहे. त्यासाठी 13 मे पर्यंत कोणीही गाफील राहू नका,’ असे आवाहन वरुण सरदेसाई यांनी युवासैनिकांना केले.

अधिक वाचा –
– Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख
– मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News
– वाघेरेंची ताकद दुपटीने वाढली, मराठा समाजाकडून मावळ लोकसभेत संजोग वाघेरेंना पाठींबा जाहीर ! वाघेरेंनीही दिले ‘वचन’


Previous Post

‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार

Next Post

“ना मावळातून ना चिंचवडमधून, श्रीरंग बारणेंना लीड मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून”, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
DCM Devendra Fadnavis rally

"ना मावळातून ना चिंचवडमधून, श्रीरंग बारणेंना लीड मिळणार 'या' विधानसभा मतदारसंघातून", देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.