वटपौर्णिमा म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा आणि सर्वोच्च आनंदाचा सण. आपल्या प्रिय पतीसाठी देवाकडे सर्वात मोठं देणं मागणे अर्थात साथ जन्माची साथ मागण्याचा हा दिवस. त्यामुळे गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्रच महिला हा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा करतात. मावळ तालुक्यातही गावोगावी आणि शहरांत ‘सावित्रीं’नी वटवृक्षाला फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खरेतर वटपौर्णिमेचा सण म्हणजे पावसाळी वातावरण ठरलेलं असायचं. मात्र यंदा वटपौर्णिमा हा सण अगदी पावसाळ्याच्या तोंडावर आला. त्यात मान्सूनपूर्व सरी न बरसल्याने उन्हाची तीव्रता अधिकच वाढली होती. अशातही रखरखत्या उन्हात पवन मावळ भागातील मौजे शिळींब गावातील महिला या वटवृक्षाला फेऱ्या मारताना दिसल्या. यातच त्यांचा आनंद आणि जिव्हाळा दिसून येत होता. ( Vat Purnima 2023 Celebrated In Maval Taluka )
वटपौर्णिमेचे महत्व –
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यंदा आज ( शनिवार, दिनांक 3 जून ) रोजी वटपौर्णिमा हा सण आला. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. गावखेड्यात महिला हा दिवस अत्यंत आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा करतात.
अधिक वाचा –
– पिंपळोली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न, आमदार सुनिल शेळकेंकडून निधी उपलब्ध
– मोठी बातमी! मुळशी तालुक्यातील 40 वर्षीय व्यक्तीचा पवनमावळातील चावसर गावाजवळ पवना धरणात बुडून मृत्यू