मावळ तालुक्यातील कृषि विभागाचे कर्तव्यदक्ष मंडळ कृषि अधिकारी नंदकुमार साबळे बुधवारी (दिनांक 31 मे 2023) रोजी कृषि विभागात केलेल्या 37 वर्षांच्या अखंडित सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. मावळ तालुका कृषि विभागातील एक प्रामाणिक काम करणारा, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा, शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले अधिकारी म्हूणन त्यांचा नावलौकिक होता. ( maval taluka mandal agriculture officer nandkumar sable retired )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नंदकुमार साबळे यांची कारकीर्द…
नंदकुमार साबळे हे 1985 साली Bsc.Agri झाल्यानंतर प्रथम 1986 रोजी सासवडमध्ये कृषी सहाय्यक पदावर रुजू झाले. तिथे दोन वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर 1987 मध्ये पंढरपूर येथे नॉन कढा विभागामध्ये जॉब केला. 1994 मध्ये परत विभागाचे शिफ्टिंग झाले. त्यानंतर रायगड जिल्हा मध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये येथे बोर्ली पंचतन दिवेआगार येथे कृषी सहाय्यक पदावर कामकाज केले. 1998 रोजी एक खिडकी योजनेमध्ये सांगोला येथे कृषी सहाय्यक पदावर काम केले. चांगल्या कामाचे शासनाने कौतुक करून एक इन्क्रिमेंट देण्यात आली. कृषि विभागाच्या विविध योजना त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या.
मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी 2008 मध्ये मावळ येथे बदली करून घेतली. पदोन्नतीने कृषि पर्यवेक्षक झाल्यानंतर घोडेगाव (ता. जुन्नर) इथे 2010 रुजू झाले. त्यानंतर 2012 रोजी मावळ तालुक्यात काळेकॉलनी कृषी पर्यवेक्षक पदावर बदलीने हजर झाले. सेवानिवृत्तीच्या सहा महिने अगोदर त्यांना शासनाने मंडळ कृषि अधिकारी वडगाव येथे पदोन्नती देण्यात आली. कृषी विभागाच्या योजना राबविताना त्यांनी शेतकऱ्यांना आपलेसे केले. त्यामुळे ते शेतकऱ्यांमध्ये खूप आदर असलेले अधिकारी म्हूणन ओळखले जाऊ लागले. तालुक्यातील कृषि विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेऊन पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुळशी तालुक्यातील 40 वर्षीय व्यक्तीचा पवनमावळातील चावसर गावाजवळ पवना धरणात बुडून मृत्यू
– उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांनो सावधान! थेट कारवाई होणार, सायली म्हाळसकर ‘इन अॅक्शन मोड’